Shreerang Charitable Trust
  • Home
    • Mission
    • Vision
  • About
    • About Shreerang
    • Our Team
  • Our Events
  • Ranggandha
  • Join Us
    • Collaboration
    • Donation
    • Become Volunteer
    • Join Event
  • Gallery
    • Photo Gallery
    • Video Gallery
    • Print Media
  • Contact
Loading Events
19 Jul

‘रंगगंध वारी’…..

  • 8:00 am - 5:00 pm
  • Mumbai

आषाढी एकादशी निमित्त श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या “रंगगंध” उपक्रमाअंतर्गत रंगगधं सांगीतिक विठ्ठल साकारण्यात आला आहे. प्रत्येक रंग निसर्गात आपलं वैशिष्ठ घेऊन असतो हा सगळा रंग मिसळला की काळाचं रंग दिसतो.

अंध व्यक्ती गंधाच्या साहाय्याने रंग ओळखून चित्र काढू शकतात उदाहरणार्थ लाल म्हणजे गुलाब, हिरवा म्हणजे तुळस इत्यादी, या रंगाच्या एकत्रीकरनातुन जो काळा रंग होतो तो विठ्ठलच दिसतो . अशी संकल्पना या गीतातून मांडण्यात आली आहे या रंगगंध सांगीतिक विठ्ठलाची मूळ संकल्पना ‘सुमित पाटील यांची असून या गीताचे गीतकार नितीन मोकल आहेत, संगीतकार योगिता तांबे आहे, हे गीत मनश्री सोमण यांनी गायलं असून संगीत संयोजन संदेश कदम आणि ध्वनी संकलन शिवहरी रानडे यांनी केलं आहे

आकांक्षा वाकडे, प्रतीक्षा डोळस,शबनम अन्सारी,काजल कलवार या अंध कलाकारांना घेऊन या गीतांच चित्रीकरण करण्यात आलं आहे या चित्रीकरणाची जबाबदारी विघ्नेश शिंदे आणि संकलनाची जबाबदारी सौरभ नाईक यांनी उत्तम पार पाडली याला सहाय्य अमित चिपळूणकर आणि प्रथमेश सावरडेकर यांनी केलं आहे

रंगगधंची ही वारी अखंड चालू राहून प्रत्येक दृष्टीहीन व्यक्तिपर्यत हा उपक्रम पोहचावा त्यांनी त्यांच्या कलेतून डोळस व्हावं अशी आम्ही विठ्ठला चरणी प्रार्थना करतो/

 

 

 

 

Copyrights © 2019 Shreerang. All rights reserved | Website Design & Developed by VIPUL PORE
  • Terms of Service
  • Privacy Policy